देशाला योग्य दिशा देण्याचे कार्य फक्त युवकांच्या हाती:- आशिष देवतळे.
वरोरा:- दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा वरोरा शहराच्या वतीने शहरातील अनेक युवकांनी मा. आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ नियोजन व वने मंत्री, मा. हंसराजजी अहीर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, मा.देवरावजी भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. आशिषजी देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरोरा शहरातील युवकांनी भाजयुमो पक्षात प्रवेश केला.
यावेळी कार्यक्रमाला वरोरा शहराचे नगराध्यक्ष मा.अहेतेशामजी अली, भाजपा शहराध्यक्ष सुरेशजी महाजन, नगरसेवक दिलीपजी घोरपडे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशजी दुर्गपुरोहित, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, जिल्हा सचिव महेशजी श्रीरंग, केतन शिंदे, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतिक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदीत्य शिगांडे, सोशल मीडिया विधसनसभा प्रमुख राहुल बांदुरकर, शहर उपाध्यक्ष संजूजी राम, अभिषेक सातोकर, राहुलजी दागमवार, रोशनजी लखोटे, निषिकांतजी डफ, अभिजितजी गयनेवार, कुणालजी नक्षीने, अमोल शेंडे, प्रतीक काळे, यांच्या विशेष उपस्थितीत परी लान वरोरा येथे पक्ष प्रवेश संपन्न झाला. अमोलजी देऊडकर युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचा माध्यमातून कार्यक्रम यशस्वी पार पडला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवकांना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.