गोंडपिपरी रस्त्याच्या कामात पाईपलाईन फुटली; चार गावात पाणी टंचाई.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी मार्गाचे काम करीत असतांना मुख्य पाईपलाईन फुटली.परिणामी चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या चारही गावात पाण्याची मोठीच टंचाई असते.ही बाब लक्षात येताच गुरबक्षाणी कंपनीने पुढाकार घेत चारही गावात ट्रंकंरने पाणी पुरवठा सूरू केला आहे. किरमीरी-हीवरा-पोडसा मार्गाचे काम गुरबक्षानी या कंपनीव्दारे सूरू आहे.

    या मार्गाचे काम करीत असतांना चेकबापुर पाणी पुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे कुडेनांदगाव, चेकनांदगाव, हेटीनांदगाव, टोलेनांदगाव या चार गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला.या चारही गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. पाणी पुरवठा बंद झाल्याने चारही गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली.

याची माहीती कंपनीचे व्यवस्थापक नागेश ठाकरे यांना मिळाली. त्यांनी लगेच गावात ट्रकंर पाठविले. मागील तीन दिवसापासून ट्रंकरचा पाण्याने गावकरी तहान भागवित आहेत.दरम्यान फुटलेल्या पाईपलाईनचा दुरस्तीतीचे काम सूरू असून लवकरच पाणी पुरवठा पुर्वरत सूरू होईल अशी माहीती ठाकरे यांनी दिली.