ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती येथील युवा सेनेतर्फे हिंदू हृदय सम्राट मा . बाळासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक बाळासाहेब ठाकरे प्रवेश या परिसरात घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमातून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा, जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी साहेब, तसेच युवा सेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, व जिल्हा समन्वयक पप्पू सारवान यांच्या मार्गदर्शनातील युवा सेना भद्रावती तालुका संघटक महेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यावेळी शैलेश पाटेकर अमोल कोल्हे, कल्याण मंडल, सरताज सिद्धकी, नितीन गेडाम, सुशांत पाढाल, चेतन बरबडकर, मनोज पवार शुभम कवाडे, निखिल बावणे, युगल टेगणे, प्रीतम देवतळे, सागर घुमे, सुरज डाखरे, शुभम राऊत, रोहित स्वान, बादल बावणे, सोनू बोनगिरी, गोलू राय, सुमित बॅनर्जी, धीरज भगत, आधी झिंगरे, साहिल वांढरे, केतन तिडके आदी युवा सेनेचे पदाधिकारी तथा युवा सैनिक उपस्थित होते.