पोंभुर्णा:- स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव याच वर्षी नुकताच महाराष्ट्र शासनाने राज्यातील थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट केल्याचा आनंद पोंभुर्णा तालुक्यात मनसे सैनिकांनी* आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रीत्यर्थ क्रांतिजोती सावित्रीबाई फुले चौक पोंभुर्णा येथे स्व. "बाळासाहेब ठाकरे जयंती" कार्यक्रम आज दिनांक 23/01/2021 साजरी करून. पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे याच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी जेष्ठ नागरिक मा. अनवर खान पठान यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भुजंगराव ढोले तालुकाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तथा अखिल भारतीय माळी महासंघ पोंभुर्णा, वंचित आघाडी चे शामकुमार गेडाम, अतुल वाकडे, अविनाश वाडके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच कार्यक्रमाला देवराव कोटरंगे, संतोष मुलगेलवार, सुभान पठाण, अफजल पठाण, गुरुदास गुरुनुले हे उपस्थित होते.
न. प. च्या सफाई कामगारांना जिलेबी भरवून अनोख्या पद्धतीने जन्मदिन साजरा केला. त्यांची नम्रता व कल्पकता कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसे तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतिवार, उपाध्यक्ष किशोर वाकुडकर, तालुका सचिव अमोल ढोले, मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, उपाध्यक्ष मनविसे राजु गेडाम, शहराध्यक्ष निखिल कन्नाके, हनुमंत थोटे, वैभव मेश्राम, आशिष राजु नैताम, प्रज्योत मानकर, स्वप्निल राऊत, चेतन हजारे, व असंख्य मनसैनिक उपस्थित होते.