कामगार मेळावा संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- देशात कामगार बरेच आहे त्याचे संघटन सुधा आहे.मात्र असंघटीत कामगाराचे मजबूत संघटन नाही हे लक्षात घेता महाराष्ट्र बिल्डिंग कामगार व फॉरेस्ट अँड वूड वर्कर युनियन या नावाने देश पातळीवर संस्था असंघाठीत कामगारांसाठी काम करत असून त्यांना अथाविस प्रकार चे फायदे त्यांना दिले आहे मात्र कामगारांना याचा मोबदला मिळत नाही. हे लक्षात घेऊन कोरपना तालुक्यात याची स्थापना प्रचार व प्रसार करण्या करिता थुत्रा येथे सभेचे आयोजन केले होते.
यावेळी दादाराव डोंगरे, द्यागेश डोंगरे, पत्रकार रफिक शेख यांना कामगारांना मार्ग दर्शन केले अध्क्षस्थानी नागपूर येथील व महाराष्ट्र प्रभारी दादाराव डोंगरे,चंद्रपूर द्यानेश सोंदुले, महिला जिलाध्यक्ष प्रगती पडगीलवार,प्रतिनिधी आरती आगलावे, सह स्थानिक विजय ठाकरे,आयोजक माणिकगड सिमेंट कामगार नेता बी. डी. सिंघ,अमानत आली,अरुणकुमार शुक्ला,किशोर राऊत, एस. एन. मेलेकर,अशोक रॉय,प्रमोट जहादे, हजर होते यात तंदुपत्ता काम करणारे महिला बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात हजर होते.कार्यक्रम संचालन बी. डी. सिंग यांनी केले तर आभार विजय ठाकरे यांनी मानले.