चंद्रपूर:- घुग्गुस येथून जवळच असलेल्या उसगाव येथील विजय मारोती सदाफळे या बाराव्या वर्गात शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यास भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांनी आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपसली.
आज दिनांक 4/1/2021 रोजी बाराव्या वर्गाचा परीक्षेचा फार्म भरण्याचा अंतिम दिवस होता त्यामुळे विजय सदाफळे या विद्यार्थ्या जवळ परीक्षेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आर्थिक विवंचनेत होता.
त्याचे वडील रोजमजुरी करीत असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती.
आज परीक्षा फार्म फी भरण्याची अंतिम मुदत असल्याने त्याने आपल्या काही मित्रांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याचा एका मित्राने तू घुग्गुस येथील भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांच्या कडे जा असे सांगितले तेव्हा सकाळीच त्याने भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांची घुग्गुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात येऊन भेट घेतली व आपली समस्या सांगितली तेव्हा त्यांनी त्या विद्यार्थ्यास तात्काळ आर्थिक मदत दिली.
आर्थिक मदत मिळताच विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले त्यांनी भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांचे मनापासून आभार मानले.