(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट येथे आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रस्तुत कार्यक्रम महाविद्यालयातील महिला सेवा व सशक्तीकरण केंद्राच्या वतीने घेण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. स्नेहा गोविंदवार, कू. कल्याणी माडूरवार, कू. निकिता बोमकंटी वार, कू. ऋतुजा चौधरी, कू. प्रीती शिवणकर यांनी आपापले मनोगत दृक श्राव्य माध्यमातून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. नलिनी जोशी यांनी आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवास चे वर्णन आपल्या व्याख्यानातून प्रस्तुत केले, तसेच सावित्री बाई फुले यांचे जीवचरित्र जी कुणी स्त्री अंगिकरेल ती आपल्या जीवनात यशस्वी होईल आणि ती इतर स्त्रियांसाठी एक स्त्री शक्ती करण चे उदाहरण होईल असे विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. प्रस्तुत कार्यक्रमास सह संयोजिका प्रा. पूनम चंदेल, प्रा. प्रतिक बेझलवार, प्रा. अविनाश चाकिनारपुवार, प्रा. महेंद्र अक्कल वार, प्रा. संजय कुमार, प्रा. जगदीश गभणे, प्रा. डॉ. आशिष चव्हाण, स्वप्ना लाभसेटवार, संघमित्रा निमगडे आणि शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.