देवाडा खुर्द गावालगतची घटना.
Bhairav Diwase. Jan 04, 2021
पोंभुर्णा:- देवाडा खुर्द येथे धानाचे तनिस घेऊन जात असलेल्या चार चाकी वाहणाला शार्ट शर्किट ने आग लागल्याची घटना ४:०० वाजताच्या सुमारास घडली. आगीत तणीस व चार चाकी वाहन जळुन खाक झाले. चालकाने समयसूचकता दाखवत आग लागलेली गाडी गावाबाहेर घेऊन उभी केली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
यापुर्वीही पोंभुर्णा येथे एक कार जळाल्याची घटना घडली होती. आता हे तणसीचे भरलेले वाहत जळाले आहे. गावातील विद्युत तारांच्या शार्ट शर्किट ने देवाडा येथे गावातच वाहणाने पेट घेतला याची कल्पना वाहनचालकाला मिळताच त्यांनी पेट घेत असलेल्या वाहणाला गावाबाहेर घेऊन गेला. याची माहिती मिळताच पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व नगरपंचायत पोंभुर्णा ची अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले नंतर ति आग विझविण्यात यश आले पण तो पर्यंत वाहन जळुन खाक झाले होते. वाहन कवडु मारमल्लीवार रामपुर दिक्षीत यांच्या मालकिचे असल्याचे सांगितले जात आहे.