Top News

चंद्रपुरात भूमाफिया सक्रिय.

19 प्लॉट धारकांची फसवणूक.
Bhairav Diwase.    Jan 29, 2021
चंद्रपूर:- स्थानिक तुलसी नगर (राष्ट्रवादी नगर) येथे मौजा वडगाव ता. जि. चंद्रपूर शेत जमीन सर्व्हे क्र.14/3 तलाठी सा. क्र. 11 ब. न. 261 एकूण आराजी 0.96 हे.आर. ह्या जागेवर सर्व श्रीमती गिरजाबाई खिरडकर, मंजुबाई नानाजी जोगी, सखुबाई मारोती जोगी व विठूबाई भाऊराव मासिरकर या बहिणींनी 2008-09 साली फिर्यादी 16 लोकांना प्लॉट पाडून 19 प्लॉट नोटरी द्वारे विक्री करून ताबा पावती दिली होती. 19 प्लॉट घेणारे हे सर्व 16 लोक अत्यंत गरीब किंवा निम्न मध्यम वर्गीय परिवाराचे आहे। त्यापैकी 1 चहा चा ठेला चालवतो, 1 शेत मजुरी करतो तर काही लोक खाजगी नोकरी करतात.

या सर्वांनी त्याकाळी म्हणजे 12-13 वर्षा अगोदर आपले घरातले दागिने विकून किंवा उधार घेऊन प्रत्येकी प्रति प्लॉट 50 ते 80 हजार रुपये अंदाजी एकूण 10 -12 लाख रुपये पर्यंत या चार बाईंना हे प्लॉट विकत घेण्यासाठी दिले. नोटरी झाल्यावर सर्वाना वाटले की आता त्यांचा पुढिल आयुष्य चांगला होईन आणि जेव्हा पैशे राहील तेव्हा तिथे घर बांधून स्वतःच्या घरी राहण्याचे सुख भोगू.

परंतु त्या 4 बहिणीच्या संपर्कात आधी पासूनच भु माफिया महेंद्र राधेश्याम जोशी होता. त्याची नजर ह्या जमिनीवर होती आणि त्याने हे माहीत असून सुद्धा की बाईंनी 16 लोकांना 19 प्लॉट विकले आहे त्या बाईंना लालच देऊन 20 लाखात संपूर्ण 0.96 हे.आर. ची विक्री व रजिस्ट्री 2013 साली करून घेतली. त्यांनी बाईंना सांगितले की कोणी प्लॉट धारक येईल तर मी त्यांना पाहून घेईन. महेंद्र जोशी अश्याच प्रकरणात सिस्टर कॉलनी मध्ये लोकांकडून मार खाल्ला होता आणि आता पण पडोली येथे त्याच्या राहत्या घराची  कोर्टात केस सुरू आहे.

आमच्या माहितीनुसार महेंद्र जोशी व त्याचा मुलगा प्रमोद जोशी हे वडगाव निवासी असून पहिले कोळसा व्यापारी होते पण धंदा बंद झाल्यावर यांनी पैसे आणि ताकत च्या बळावर असेच वादग्रस्त जमिनी घेऊन श्रीमंत बनण्याचा गोरख धंदा सुरू करून भूमाफिया ची सुरवात केली असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. 

2018 साली 16 प्लॉट धारकांनी दुर्गापूर पोलीस स्टेशन ला या बहिणी व जोशी विरुद्ध रीतसर तक्रार केली पण जोशी च्या पैसा समोर कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्याच साली या 16 लोकांनी ऍड.  च्या मार्फत त्या बहिणींना व जोशी ला नोटीस पाठवली पण कोर्ट फी चे पैसे नसल्यामुळे कोर्टात केस टाकू शकले नाही. आता पुन्हा एकत्रित येऊन आपल्या हक्का साठी लढण्याचा या प्लॉट धारकांनी अंतिम फैसला केला व या प्रकरणाची तक्रार पुन्हा एकदा दुर्गापूर पोलीस ठाण्यात दि. 20 जानेवारी 2021 ला पोलीस अधीक्षक व दुर्गापूर पोलीस ठाण्यात केली. पोलीस अधीक्षकांनी जातीने लक्ष देण्याचा आश्वासन दिले परंतु दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना पोलीस निरीक्षक स्वप्न कडुन या फिर्यादींना चांगली वागणूक मिळाली नाही.  यांनी प्लॉट धारकांना 2 वेळा तक्रार बदलावी लावली, महेंद्र जोशी द्वारे प्लॉट धारकाद्वारे लावलेला लोखंडी बोर्ड चोरून नेल्याची तक्रार घेतली नाही आणि वारंवार तुमचीच चूक आहे अशे सांगण्यात आले. 4 दिवसानंतर जोशीला व बहिणीला बोलवून समोरासमोर बोलणी करून देत असताना पी.आई. नि वारंवार जोशीला ‘तुमची चूक नाही’ अशे म्हणत होते. त्यामुळे यंदाही प्लॉट धारकांना पोलीस कळून न्याय मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला जोशी आमच्या प्लॉट वर अतिक्रमण करून वेगाने प्लॉट डेवलोपमेंट करून डेव्हलपर्स आणि  या माध्यमातून या विवादित जागेवरचे प्लॉट पाडून विकत आहे आणि पुन्हा नवीन लोकांची फसवणूक करीत आहे।
म्हणून आता हे अन्यायग्रस्त प्लॉट धारक प्रेस कॉन्फरन्स द्वारे मीडिया आणि जनतेला न्याय मिळवून देण्यात मदत करावी अशी विनंती करीत आहे आणि लवकरच न्याय न मिळाल्यास आम्ही सर्व प्लॉट धारक उपोषणाला बसू व गरज पडल्यास प्लॉट वर आत्मदाह सुद्धा करू असा इशारा 16 प्लॉट धारकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिला आहे. तरी कोणी या जागेवर या लोकांद्वारे प्लाट विकत घेऊ नये असा आवाहन प्लॉट धारकांनी केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने