शंकरपाळ्या व कारल्याच भांडण झाल सोशल मीडियावर व्हायरल.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Jan 28, 2021

इंटरनेटच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही . जगभरात दररोज काही न काही गमतीजमती घडतात आणि अशीच एक गंम्मत बुलढाणा जिल्ह्यातील कळमेश्वर गावात घडलीय. त्याच झालं असं की शंकर आणि कार्तिक नावाचे मित्र खेळता खेळता अचानक भांडायला लागले. भांडता भांडता त्यांनी एकमेकांना नावावरून चीड पाडली. त्यातील कार्तिकने शंकरला अय शंकरपाळ्या म्हणून चिडवलं. वऱ्हाडी भाषेत त्याला खिजवलं म्हणतात. आणि मग काय शंकरने फिल्मी स्टाईलमध्ये त्याला दम दिला आणि उपस्थित असलेल्या कुणीतरी तो व्हिडीओ कडून व्हायरल केला.

पाहता पाहता हा व्हिडिओ संबंध महाराष्ट्रात व्हायरल झाला. मिम्स बनले...फेसबुकवर जोक्स बनले आणि बरंच काही तुफान या व्हिडीओमुळे घडलं..