Top News

विद्यार्थ्यांकडे गोंडपिपरी ते आक्सापुर दरम्यान पास असूनही होतेय पैश्याची मागणी.

विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले माजी नगरसेवक राकेश भाऊ पुन.

पंचायत समिती सदस्या सौ. भुमीताई पिपरे यांच्याकडून गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी ते आक्सापुर दरम्यान जाणारी सकाळी 7:30 वाजताची मानवकल्याण बस आक्सापुर येथील विद्यार्थ्यांकडे पास असूनही वाहक पैश्याची मागणी करत आहे. या बसने आक्सापुर, करंजी, जोगापुर येथील विद्यार्थी प्रवास करतात. धानापुर पासून हा पास चालत नाही. तुम्हाला पैसे द्यावे लागेल. धानापुर पासून तुम्हाला टिकीट काढाव लागेल. जर टिकीट न काढल्यास धानापुर फाट्याजवळ उतरवून देवू अशी विद्यार्थ्यांना धमकी देण्यात येत आहे. 
       
        विद्यार्थ्यांनी वाहकाला विचारल्यास वाहतूक नियंत्रण मोरे साहेबांचा आदेश आहे. अस विद्यार्थ्यांना सांगतात. या कारणांमुळे विद्यार्थ्यांना सुपर बसेस अवलंबून राहाव लागत आहे. परंतु सुपर बसेस आक्सापुर येथे थांबा असूनही थांबा नाही. असे कारणे देत प्रवास करु देण्यास विद्यार्थ्यांना टाळाटाळ करतात.
        
विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या लुट बद्दल विद्यार्थ्यांना पंचायत समिती सदस्या सौ भुमीताई पिपरे यांना सांगितली. तात्काळ दखल घेत पंचायत समिती सदस्य सौ भुमीताई पिपरे यांनी विद्यार्थ्यांची लुट थांबावी. व बस ची व्यवस्था करुन द्यावी. याकरीता गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आणि  निवेदनाची तात्काळ दखल घेतली जावी. अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगरसेवक राकेश भाऊ पुन हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने