🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दिव्यांग व्यक्तीचा अंत्योदय यादित समावेश करुन स्वतंत्र शिधापत्रिका द्या.

भारतीय क्रांतिकारक दिव्यांग संघटना पोंभुर्णा ने केली निवेदनाद्वारे मागणी.
Bhairav Diwase.     Jan 28, 2021

पोंभुर्णा:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र शिधापत्रिका व अंत्योदय योजना चा लाभ देण्यात यावे अशी मागणी भारतीय क्रांतिकारक दिव्यांग संघटना पोंभुर्णा च्या वतीने तहशीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 पोंभुर्णा तालुक्यात शेकडो दिव्यांग बांधव वास्तव्य करीत आहेत.त्यांचे संयुक्त कुटुंबात राहणे आहे परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा शासन निर्णय नुसार मात्र त्यांना स्वतंत्र शिधापत्रिका व अंत्योदय योजनेचा लाभापासून वंचित आहेत. यासाठी शासन निर्णय नुसार दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात यावी तसेच दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी भारतीय क्रांतिकारक दिव्यांग संघटना पोंभुर्णा च्या वतीने तहशीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष रफिक अहमद कुरेशी, उपाध्यक्ष नवनाथ पिपरे,  सचिव अविशांत अलगमवार,गयाबाई भलवे, शारदा मोगरकर, देविदास उराडे अनिल सातपुते, संतोष सातपुते,अरुणा अल्लीवार,शुभम धोडरे, रामचंद्र गद्देकार, प्रफुल्ल धोडरे व असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.