ग्रामीण भागात शेतकरी संघटनेची मजबूत पकड असल्याचे स्पष्ट.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राजुरा विधानसभा क्षेत्रातील एकुण ८९ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर करण्यात आले.
राजुरा तालुक्यातील बामनवाडा, चनाखा, पंचाळा, सिंधी, विहिरगाव, कविठपेठ, चंदनवाही, मुठरा, कडमना, नलफडी, मुर्ती, चार्ली, मारडा, वरोडा, चुनाळा, सातरी, कोहपरा, धानोरा, चिंचोली बु, सुमठाणा, खामोना, पेल्लोरा, चिंचोली खु, कोलगाव, पवनी, धिडसी, कडोली बु या ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले.
राजुरा तालुक्यात २८ ग्रामपंचायतीमधे निवडणूक झाली. त्यात शेतकरी संघटना ९, काँग्रेस - ७, भाजपा - ६, संमिश्र आघाडी व इतर पक्ष- ६ असे बलाबल राहिले.
जिवती तालुक्यातील एकमेव परमडोली ग्रामपंचायतीचा निकाल संमिश्र आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी, सालेझरी, विहिरगाव, वटराना, वेजगाव, लाठी, वेडगाव, सखनुर, हेटीनांदगाव, सोमनपल्ली, वडकूली, तारसा बु, कोरंबी, पोडसा, नंदवर्धन, बेरडी, बोरगाव, सुपगाव, धामणगाव, दरूर, पारगाव, डोंगरगाव, तोहोगांव, भांगाराम तळोधी, धाबा, खराडपेठ, धानापुर, सोनापूर, हिवरा, चक लिखितवाडा, चेक बोरगाव, पानोरा, अडेगाव, चेकदरुर, चेक पिपरी, विठ्ठलवाडा, वडोली , तारडा , आक्सापूर, करंजी, पुरडी हेटी, किरमिरी, चेक घडोली आदी ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. गोंडपिपरी तालुक्यात काँग्रेस आघाडीवर असून १२ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. तर १७ जागांवर संमिश्र आघाडीचे व इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले. भाजपा ८ तर शेतकरी संघटना ६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.
कोरपना तालुक्यात १७ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक झाली. तिथे शे. संघटना व त्यांच्या आघाडीचे एकूण १० ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. काँग्रेसने ४, भाजपने २ तर गोंडवाना गणतंत्र पक्षाने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.
एकंदरीत राजुरा विधानसभा क्षेत्रात ८९ ग्रामपंचायतींचे निकाल खालील प्रमाणे राहिले :
शेतकरी संघटना - २५
काँग्रेस - २३
भाजपा - १७
इतर आघाडी व पक्ष - २४
आता सरपंच पदाची सोडत जाहीर झाल्यानंतर ही लढाई आणखी चुरशीची होणार आहे.