अवैध धंद्याला पायबंद घाला. आम आदमी पार्टी चे गृहमंत्र्याला निवेदन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 23, 2021
चंद्रपूर:- अवैध दारू विक्रेते, सट्टा बाजार, कोंबड बाजार, सुगंधी तंबाखू तसेच रेती तस्करांवर पोलीस विभागाने आळा घालावा तसेच पोलीस विभागाने जनतेला योग्यप्रकारे सेवा द्यावी या विविध विषयाचे निवेदन घेऊन आम आदमी पार्टी चे शिष्टमंडळ श्री. सुनिल देवराव मुसळे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात माननीय गृहमंत्री श्री. अनिलराव देशमुख यांना भेटले आणि निवेदन दिले.

    संपुर्ण चंद्रपुर जिल्हा हा अवैध धंदे बिनबोभाट पणे करण्यास प्रसिद्धी ला आला आहे. जे काम प्रशासनाला करायला पाहिजे ते काम लोक प्रतिनिधि करतात या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते असा खडा सवाल आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष इंजि. प्रशांत प्रभाकर येरणे यांनी गृहमंत्री साहेब यांना केला.
    
मंत्रीमहोदयानी समन्धितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सुनिल भोयर, संतोष दोरखंडे , भिवराज सोनी, अशोक आनंदे, योगेश आपटे, हिमायु अली, अजय डुकरे, बबन क्रिश्नपल्लिवार, दिलीप तेलंग, राजू कुडे आणि असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.