Top News

धनगर अधिकारी-कर्मचारी संवाद सभा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा चंद्रपूर यांचे वतीने दिनांक 24 जानेवारी 2021 रोज रविवार ला ज्ञानेश्वर मंदिर सुमठाना, भद्रावती येथे साहेबराव घोरूडे यांच्या प्रांगणात संवाद सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सभेची वेळ अकरा वाजता ठेवण्यात आलेली आहे

  या सभेचे मार्गदर्शक म्हणून श्री. अनिलकुमार ढोले, राज्याध्यक्ष धनगर अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मार्गदर्शन करणार आहेत. सभेचे अध्यक्षस्थानी मा. साहेबराव घोरुडे सुमठाना भद्रावती यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित केलेली आहे. तरी धनगर समाजातील कर्मचारी बांधव यांनी संघटनात्मक जुळणी करून एकत्र यावे व सामाजिक चळवळ ची दिशा, भविष्यातील समाजाचे आव्हाने व परिचयाच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सर्वांची संघटनात्मक जुळणी  करावी  या उदात्त अपेक्षेने ही सभासद जोडणी संवाद सभा आयोजित करण्याचे ठरले आहेत.
  
सभेचे स्थळ:- ज्ञानेश्वर मंदिर, सुमठाणा मा. साहेब रावजी घोरुडे यांच्या प्रांगणात सुमठाना भद्रावती.

सर्व विभागाच्या धनगर अधिकारी व कर्मचार्याची नियोजित वेळेवर उपस्थिती प्रार्थनिय आहे.

टिप:- सभेला येतांना सोबत पासपोर्ट साईज फोटो आणण्याचे आव्हान जिल्हा संपर्कप्रमुख कैलास उरकुडे व संजय बोधे,वरोरा  यांनी केले. सभेविषयी सविस्तर माहिती करिता  9637709340 या नंबर वर सभासद बांधवांनी संपर्क साधावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने