भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणात दोषींना फाशी द्या.

Bhairav Diwase
प्रयास सखी मंच अध्यक्ष किरणताई बोढे यांची मागणी.
Bhairav Diwase. Jan 13, 2021
चंद्रपूर:- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील 10 बालकांच्या जळीत प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. पीडिताना आर्थिक मदत द्यावी दोषीवर तात्काळ कारवाही करीत फाशी द्यावी. संबंधीत डॉक्टर, नर्स, व जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करावे अशी मागणी घुग्गुस पोलीस स्टेशन चे सह. पो. नि. गोरक्षनाथ नागलोत यांना निवेदनातून घुग्गुस प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरणताई बोढे यांनी केली आहे.

निवेदन देताना मुख्य मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे, जि. प महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुम सातपुते, नंदा कांबळे, सुचिता लुटे, सामाजिक कार्यकर्त्या सरस्वता पाटील, सौभाग्या तांड्रा, सुनीता पाटील, नाझीमा कुरेशी, सुलभा ठाकरे, सपना मांढरे, निषाद शेख, नफिसा खान, अनिता लालसरे, नाझीया शेख, सुनंदा लिहीतकर उपस्थित होत्या.