🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ढोरवासा केंद्र पंचायत राज समिती साठी सज्ज.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेली पंचायत राज समिती फेब्रुवारी च्या 9 तारखेला चंद्रपूर जिल्याच्या दौऱ्यावर येणार असून यासाठी तालुक्यातील ढोरवासा केंद्राने आपली तैयारी अंतिम टप्प्यात आणली आहे केंद्रात मुरसा, घोनाड, कोच्ची, पिपरी, ढोरवासा, चिरादेवी, गवराळा, देऊरवाडा, तेलवासा, कुणाडा, चारगाव अश्या 11 जिल्हा परिषद शाळा आहेत यात ही समिती शाळेच्या भौतिक सुविधेचे परीक्षण करणार आहे यात शाळेचे स्वच्छतागृह, शाळा परिसर डागडुजी, रंगरंगोटी, शालेय दस्तऐवज या सर्व बाबी तपासणार आहेत या कामात सर्व शिक्षक व मुख्याध्यापक मग्न असून केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड हे गटशिक्षणाधिकारी श्री धनपालजी  फटींग साहेब यांच्या मार्गदर्शनात लक्ष ठेवून आहेत. तीन दिवस ही पंचायत राज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार असून जिल्ह्याच्या कोणत्याही शाळेत ही समिती भेट देणार आहेत याचीच पूर्ण तैयारी ढोरवासा केंद्राने केंद्रप्रमुख श्री गायकवाड साहेब यांच्या सूचनेनुसार पूर्ण केली असून हे केंद्र तालुक्यात नेहमीच अव्वल राहते हे विशेष. याबद्दल केंद्रप्रमुख यांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता हे सर्व केंद्रातील शिक्षकांच्या मेहनतीने व मुख्याध्यापकांच्या सहकार्याने शक्य होत असल्याचे सांगितले
तालुक्यातील सर्व शाळांवर गटशिक्षणाधिकारी श्री धनपालजी फटींग साहेब लक्ष ठेवून आहेत.