Top News

भद्रावती शहरात आता 'नो' व्हेईकल 'डे'

२ फेब्रुवारीला सायकल रॅली; भद्रावती नगर परिषदेचा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील रस्त्यावरील वाहनांची गर्दी  लक्षात घेता शहरात पर्यावरणाची हानी, ध्वनीप्रदूषण व त्यापासून होणारे विविध आजार बळावत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिने शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान' या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून २ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता भद्रावती नगर परिषद कार्यालयापासून बाळासाहेब ठाकरे प्रवेश व्दार ते परत गवराळा गणेश मंदिर पर्यंत सायकल रॅलीचे आजोजन करण्यात आले आहे.
              यापुढे प्रत्येक शुक्रवारी शहरात 'नो' व्हाईकल डे' हे अभियान राबविण्यात येणार असून या दिवशी स्थानिक नागरिक, शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व अन्य नागरिकांनी वयक्तिक वाहनाचा वापर न करता त्याऐवजी सायकल वापरावी किंवा पायदळ फिरावे व सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे. यातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहणांना वगळण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने