Click Here...👇👇👇

सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प:- आ. सुधीर मुनगंटीवार

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Feb 01, 2021
चंद्रपूर:- कोरोना मुळे उदभवलेल्या संकटावर मात करत त्यातून संधी शोधत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा संकल्प करत त्या संकल्प पूर्तीसाठी पावले उचलणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सार्थ ठरविणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार  यांनी व्यक्त केली आहे.

जानेवारी २०२१, मध्ये १.२० लाख कोटी रुपये आजपर्यंत चा रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झालं आहे. GST लागू झाल्यानंतर आजपर्यंतचा हा सर्वाधिक कलेक्शन आकडा आहे. जे लोक म्हणतात, लॉक डॉउन मध्ये छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेत, नौकऱ्या गेल्यात त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. या काळात नौकरी टिकवणं खूप अवघड झालं होतं, अश्यातच संकटातून संधीही निर्माण झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने MSME ला प्रोत्साहन देत देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठं योगदान दिले आहे. विशेषतः महाराष्ट्रात सर्वाधिक MSME ने मोठ्या प्रमाणात कर्ज  तरुणांना दिले आहे . उद्योग , कृषी , पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद करत महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुद्धा ठोस पावले या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलली गेली आहे. नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. पुन्हा या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करत त्या दृष्टीने केलेले संकल्प आश्वासक व तमाम देशवासियांना दिलासा देणारे असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या सर्वस्पर्शी अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आ. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.