🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बुलढाणा वरून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षिकेचा केंद्रप्रमुखांकडून सत्कार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- पंचायत राज समितीच्या कामात सर्व व्यस्त असताना ढोरवासा केंद्राच्या केंद्रप्रमुखांनी आपली शाळा भेट मात्र सुरूच ठेवली असून प्रत्येक शाळेचा आढावा घेण्यात ते सध्या व्यस्त आहेत.


प्राप्त माहिती नुसार नुकतीच ढोरवासा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड यांनी केंद्रातील सर्व शाळांची तपासणी केली असून आज ते केंद्रातील गवराळा येथे गेले असता तिथे नुकतेच बुलढाणा येथून आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शुभेच्छा साठे मॅडम यांचा त्यांनी सर्वप्रथम सत्कार केला सोबतच इयत्ता 5 ते 7 वर्गाचे अध्यापनाचे परीक्षण केले,इयत्ता 5 या वर्गाचे शिष्यवृत्ती चे नियोजन बघितले, शाळेचा दर्शनी व आतील भागाची रंगरंगोटी बघून समाधान व्यक्त केले, स्वच्छतागृह ,वाँटर फिल्टर ,पाणी व्यवस्था ,वर्गखोली साँनिटाँजर करण्यात आल्याचे त्यांनी बघितले,पंचायत राज समिती संबंधित सर्व दस्तावेज ची परिपूर्तता करून घेतली,शालेय दस्तऐवज तसेच विद्यार्थी नोंदवही,वर्णनात्मक नोंदी सन 20/21 पूर्तता केल्याची पाहणी करण्यात आली,कोरोना काळात वर्ग गट पद्धतीने आँफलाईन ,आँनलाईन चालू असल्यामुळे शाळेची गुणवत्ता टिकून असल्याचे साहेबानी बोलून दाखविले.
या सर्व कामात त्यांना गटशिक्षणाधिकारी श्री धनपालजी फटिंग साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहेत 
बुलढाणा येथून आलेल्या साठे मॅडम नि पण केंद्राच्या या कामाची स्तुती केली असून असेच सहकार्य मी पण देणार अशी ग्वाही केंद्रप्रमुखांना दिली.