🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर निर्बंध.

नियम व अटी लागू.
Bhairav Diwase.     Feb 12, 2021
दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवसी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि दिल्लीपर्यंत मराठ्यांच्या साहसगाथा ज्यांच्या पराक्रमांतून पोहोचल्या, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते.

महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र शिवजयंतीवर (Shivjayanti 2021) कोरोना विषाणूच्या ससंसर्गाचं सावट असणार आहे. मागील काही दिवसांत कोरोनाची दहशत काहीशी कमी झाली होती, याच पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलं होतं.

किंबहुना अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे, काही ठिकाणी नाटक- व्याख्यानं आयोजित केली गेली आहेत. पण, बुधवारी राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळं गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.

https://www.mediafire.com/download/bu60dhm8vujope0 दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर फाईल डाऊनलोड करून घ्यावी.

राज्याच्या गृहविभागाने काढलेल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणं त्यासाठी नियम व अटी लागू असणार आहेत.

१. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १ ९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

 २. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. 
 
३. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

४. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

५. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. 

६. covid - १ ९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.