Top News

घुग्गुस येथे पंतप्रधानाच्या फलकावर काळे फासणाऱ्या चंद्रपूर युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व घुग्गुस युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक, एक फरार.

अटकेसाठी भाजपाचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन.
Bhairav Diwase.     Feb 12, 2021
चंद्रपूर:- घुग्गुस येथे शुभम सर्वो पेट्रोल इण्डेण ऑइल कंपनीचे हद्दीत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची कोविड जनजागृती बद्दलच्या जाहिरातीचा फलक लावून होता. खाजगी मालमत्तेत जाऊन युवक काँग्रेसच्या नेत्यांनी फलकास काळे फासण्याचा विकृत पणा युवक काँग्रेसच्या नेत्यांनी केला. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री असून त्यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्यांचा अपमान करून काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घुग्गुस वासियांना पाहायला मिळाले.

चंद्रपूर युवक काँग्रेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर व घुग्गुस युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख यांना दिनांक 11/2/2021 रोजी रात्री घुग्गुस पोलिसानी कलम 500,427,447(34) गुन्हा दाखल करून 10:30 वाजता दरम्यान अटक केली. तर निखिल पुनगंटी हा फरार आहे.

आज दिनांक 11/2/2021 ला दुपारी 3 वाजता पेट्रोल डिझेल व गँस दरवाढीचा निषेध करण्यासाठी घुग्गुस काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.

 घुग्गुस वणी मार्गांवरील शुभम सर्वो पेट्रोल पंपवर मोर्चातील सहभागी चंद्रपूर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  4:50 वाजता तिथे जाऊन लावून असलेल्या पंतप्रधान यांच्या फलकास काळे फासले.
 
हा घडलेला प्रकार भाजपा नेत्यांना व शेकडो कार्यकर्त्यांना माहिती पडताच त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार घुग्गुस पोलीस स्टेशन येथे शेकडो कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली व असे कृत्य करणाऱ्या युवक काँग्रेस नेत्यांच्या अटकेसाठी दोन तास ठिय्या आंदोलन केले.

यावेळी घुग्गुस भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले व शुभम सर्वो पेट्रोल पंपाचे संचालक हेमराज बोमले यांनी तक्रार दिली त्यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
त्यामुळे पोलीस निरीक्षण राहुल गांगुर्डे यांनी आरोपीं कडे पोलिसाना पाठवून घुग्गुस ठाण्यात आणले व गुन्हा दाखल करून अटक केली. त्यामुळे तणाव निवळला.

यावेळी निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जिप महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षक तांड्रा,माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे,साजन गोहणे, महेश लठ्ठा,सुचिता लुटे, पूजा दुर्गम,वैशाली ढवस, युवा मोर्चाचे अमोल थेरे,माजी तंमुस अध्यक्ष हसन शेख, मल्लेश बल्ला, उत्तर भारतीय मोर्चाचे रत्नेश सिंग, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, भाजपा नेते हेमंत उरकुडे, निरंजन डंभारे,सुरेंद्र जोगी,शाम आगदारी, इम्तियाज मोहम्मद,बबलू सातपुते, अजय आमटे,शरद गेडाम, सुरेंद्र भोंगळे, धनराज पारखी,सुनील बाम,तुलसीदास ढवस,राजेन्द्र लुटे,नितीन काळे, शंकर सिद्दम,मंगेश पचारे,कोमल ठाकरे,हनीफ शेख, राजेश मोरपाका,राजू भोंगळे,मानस सिंग,सुशील डांगे,राजू डाकूर, रोहित मंडल,लड्डू चिलका,संकेत शेरकी, शुभम बोढे,राहुल बोबडे,बाळू शर्मा,श्रीकांत आगदारी, सुनील ब्रहमे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने