भद्रावती:- शहरातील बस स्थानकासमोर पिकअप वाहनाने दुचाकी वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण जखमी तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी ७.०० वाजताच्या दरम्यान घडली.
यातील दुचाकीस्वार पुरुषोत्तम कोमटी हा गंभीर जखमी असून विजय बिबटे, ज्योती ढवस हे जखमी झाले आहे. चंद्रपूर मार्गे भद्रावती कडे भारदाव वेगाने येत असलेले MH 34 AB 3931 या पिकअप वाहनाने समोर जात असलेल्या MH 34 AY 2379 व MH 34 AT 0058 या दुचाकीला धडक दिल्याने यातील तिघेजण जखमी झाले. हि घटना सायंकाळी ७ वाजता बसस्थानक परिसरासमोर घडली. दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुरुषोत्तम कोमटी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनी सुधीर वर्मा घटनास्थळी दाखल होऊन घटनेकचा पंचनामा करून पुढील तपास करत आहे.