स्वीटी आणि तिच्या आईचे मोबाईलवरून झाले किरकोळ भांडण.

Bhairav Diwase
रागाच्या भरात स्वीटी घराबाहेर पडली. आणि.......
Bhairav Diwase.      Feb 23, 2021
नागभीड:- युवतीचे आणि तिच्या आईचे मोबाईलवरून किरकोळ भांडण झाले होते. स्वीटी वसंत शेंडे असे युवतीचे नाव असून, ती मिंडाळ्यातील कनिष्ठ महाविद्यालयात ११ व्या वर्गात शिकत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी स्वीटी आणि तिच्या आईचे मोबाईलवरून किरकोळ भांडण झाले. याचा स्वीटीला राग आला. रागाच्या भरात ती घराबाहेर पडली. राग शांत झाल्यावर ती घरी येईल असे कुटुंबीयांना वाटले. पण स्वीटी घरी आलीच नाही. कुटुंबीयांनी मग नातेवाईकांकडे विचारणा केली असता, ती आली नसल्याचे सांगितले.

कुटुंबीय सोमवारी नागभीड पोलिसात तक्रार देण्यासाठी आले असता स्वीटीचा मृतदेह घरच्याच शेतातील विहिरीत तरंगताना दिसत असल्याची माहिती मिळाली. अधिक तपास ठाणेदार मडामे करीत आहेत.