🙏


🙏✍️

कोवीड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा:- भैरव धनराज दिवसे

Bhairav Diwase.   Feb 23, 2021
प्रशासन व आरोग्य विभागाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येऊ शकतो. नागरीकांनी भीती बाळगू नये, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन आधार न्यूज नेटवर्क टिमतर्फे आणि आधार न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक भैरव धनराज दिवसे यांनी केले आहे.
      
कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नागरीकांनी अकारण प्रवास करू नये, गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे व सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळे आदी ठिकाणी गर्दी टाळावी, बाहेर वावरताना हात स्वच्छ धुवून घ्यावेत, हात स्वच्छ असल्याशिवाय कान, नाक, डोळे, यांना स्पर्श करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा. 


       कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी प्रशासन व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केले तर लवकरच परिस्थिती आटोक्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आधार न्यूज नेटवर्क टिमतर्फे आणि आधार न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक भैरव धनराज दिवसे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत