ग्राम पंचायत पिपरी देशपांडे येथील सरपंचपदी श्री. चंद्रशेखर व्याहाडकर तर उपसरपंच पदी श्री. कालिदास मोटघरे यांची निवड.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दिनांक १०/२/२०२१ ला ग्राम पंचायत पिपरी देशपांडे येथील झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीतील निवडून आलेल्या सदस्यापैकी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.


    निवडून आलेल्या सदस्यामधुन सरपंच पदाचा मुकुट श्री. चंद्रशेखर रघुनाथ व्याहाडकर यांना चढवण्यात आला तर, उपसरपंच पदाची दोरी कालिदास तानुजी मोटघरे यांचे कड़े देण्यात आली. तसेच या ग्रामपंचायत वर सदस्य म्हणून सौ. वैशाली ताराचंद व्याहाडकर , सौ. प्रेमिला ओमदास पाल, सौ. गीता हिराजी कोहपरे, सौ.अनिता जालिन्दर झाडे, श्री. अमित दिवाकर तेलसे यांची निवड गावातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून केली आहे. 
    
    सरपंच पदी निवडून आलेल्या चंद्रशेखर व्याहाड़कर यांचेशी आधार न्यूज नेटवर्क चे तालुका प्रतिनिधी किशोर माहोरकर यांनी संपर्क साधुन त्यांची सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली असता. श्री. व्याहाडकर यांनी गावाचा विकास, जनकल्याणाची कामे करुन गावाचा विकास करण्याचा मानस बोलून दाखविला. आणि लोकांनी जे मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला त्यासाठी त्यांनी संपूर्ण गावातील जनतेचे आभार मानले.