ब्रम्हपुरी:- आज दिनांक 19/02/2021 वेळ 6:00 वाजता हनुमान मंदिर परिसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. पवन माटे आयकॉन बहुद्देशीय संस्था तुकुंम, मा. बाबुरावजी गजबे, मा.रघुनाथजी श्रीरामे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी श्रीनंदन गजबे यांनी शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकून बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच मा. पवन माटे यांनी पूर्वकालिन इतिहास व शिवाजी महाराज यांच्या काळातील स्त्रीयांचे सुरक्षितता व अधिकार तसेच आजच्या आधुनिक काळातील महिलावरील अत्याचार यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन वैभव श्रीरामे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार स्नेहल डांगे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य युवकांनी तसेच नागरिकांनी उपस्थिती दर्शविली सर्वांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांना मान वंदनेचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
आयकॉन बहुद्देशीय संस्था तसेच माना जमात बांधव तूकुम यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी.
शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०२१
Tags