सावली तालुक्यातील ओबीसी बांधव २२ फेब्रुवारीला गडचिरोली येथे होणाऱ्या विशाल मोर्च्यात सहभागी होणार.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase.     Feb 19, 2021
सावली:- शिवजयंती चे औचित्य साधून आज दि.१९/०२/२०२१रोजी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मालार्पन करुन ओबीसी बांधवाची सभा घेण्यात आली या सभेत प्रतेक गावागावात जाऊन ओबीसी बांधवांना जागृत करुन ओबीसी समाजावर होणा-या अन्यायाविरुध लठा देण्यास प्रवृत्त करणे,ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करणे, मराठा समाजाचा    ओबीसी मध्ये समाविष्ट करु नये, ओबीसीचे आरक्षण पुर्वरत करणे,ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृती मिळावी,शेतक-यांना शेती विषयक १००% अनुदानावर योजना मंजूर करने,विधानसभा व लोकसभेवर ओबीसीसाठी आरक्षण लागू करने इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली,येत्या २२ फेब्रुवारी ला गडचिरोली येथे होऊ घातलेल्या विशाल ओबीसी मोर्चाला सावली तालुक्यातील हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित राहणार असे आवाहन बैठकीत प्रमुख   कार्यकर्त्यांनी उपस्थित  केले,या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली चे अध्यक्ष कविंद्र रोहणकर,अविनाश पाल,अर्जुन भोयर, भुवन सहारे,दिवाकर गेडाम,अनिल मशाखेञी,नामदेव भोयर,केशव भरडकर,राजू टोंगे,गिरीश चिमुरकर,कालिदास नागापुरे,तुळशिदास भुरसे,शोभाताई बाबनवाडे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)