Top News

दोन दुचाकीची समोरासमोर गळाभेट.


Bhairav Diwase.    Feb 18, 2021
सावली:-:केरोडा जांब रोडवर जांब गावाजवळ दोन दुचाकीचा अपघात झाला. एक दुचाकी केरोडा मार्गे जांब कडे येत होती तर दुसरी दुचाकी जांब मार्गे केरोड्याकडे जात असताना दोन्ही दुचाकी या एकमेकींवर जाऊन धडक दिल्या. त्यामुळे या झालेल्या दोन दुचाकीच्या गळाभेटीत दोन्ही स्वार असलेले व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे. 

क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
धक्कादायक; आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आवाजात बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल.

जांब मार्गे जाणारे श्रीधर गडपल्लीवार  हे  जिबगाव वरुन आपल्या ड्युटीवर व्याहाड बूज. येथे पाट बंधारे विभागात जात होते. परंतु झालेल्या अपघातात त्यांना  गंभीर मार लागलेला आहे. त्यामुळे त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. तर दुसरी दुचाकीवर दोन व्यक्ती केरोडा मार्गे रैयतवारी ला येत होते. यामध्ये गिरीधर चौधरी यांना सुध्या दवाखान्यात भरती केलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने