Top News

चिंतलधाबा येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.


Bhairav Diwase.    Feb 18, 2021
पोंभुर्णा:- न्यूटच मल्टिपर्पज फाऊंडेशन च्या साहाय्याने एन टी एम सर्व्हिसेस प्रा.ली. चा उपक्रम हा संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविला जात असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील मौजा चिंतलधाबा येथे १४ फेब्रुवारी ला जीवन सरल (हेल्थ कार्ड) योजनेचा मोफत आरोग्य तपासणी शिबीर नुकताच संपन्न झाला.  या आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन मान. डॉ. रश्मी शुक्ला, सह संयोजक (होमिओपॅथी) भाजपा वैद्यकीय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान. कु. अल्काताई आत्राम, सभापती पंचायत समिती पोंभुर्णा या होत्या. याप्रसंगी मान. जे. टी. रंगारी सर, मान. प्रमोद अलोने, अध्यक्ष एन टी एम सर्व्हिसेस प्रा. ली. मान. स्मिता अलोने, सचिव, डॉ. दिनेश वाळके जिल्हा संयोजक हे प्रमुख पाहुमे म्हणून उपस्थित होते.
                        
      आरोग्य तपासणी शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना सुदृढ आरोग्याची जाणीव करून देने असून वेळीच स्वतःची आरोग्य तपासणी करून स्वतःचे आरोग्य अबाधित राखण्याचे प्रयत्न करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एन टी एम चा कार्यकर्ता काम करतो आहे. कंपनीशी करारबद्ध असलेल्या तालुका व जिल्हा स्तरावरील नामांकित खाजगी रुग्णालयाचे माध्यमातून एन टी एम हेल्थ कार्ड धारकांना 10 ते 20 टक्के पर्यंतची सवलत मिळवून देण्याचे कार्य तसेच हेल्थ कार्ड धारकांना दवाखान्यातील उपचारासाठी 10 ते 30 हजार रुपयांपर्यंत कर्ज स्वरूपात आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. दवाखान्यातील उपचारासाठी कर्ज देणारी एन टी एम ही एकमेव संस्था/कंपनी आहे.
                                       
     शिबिरामध्ये उपस्थितांची आरोग्य तपासणी करिता डॉ. अमित ढवस हृदय रोग तज्ञ चंद्रपूर, डॉ. अली सर, जनरल फिजिशियन चंद्रपूर, डॉ. किरण पटेल, स्त्री रोग विशेषज्ञ चंद्रपूर यांनी सहकार्य केले. चिंतल धाबा व परिसरातील शेकडो रुग्णांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.  या आरोग्य तपासणी शिबिराचे प्रास्ताविक फौंडेशन अध्यक्ष श्री प्रमोद अलोने यांनी केले. सूत्र संचालन जिल्हा संयोजक डॉ. दिनेश वाळके यांनी तर आभार प्रदर्शन तालुका संयोजक अनिल वाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरत ठेंगणे, महेंद्र पेंदोर, सजन मडावी, मंगला माथानकर, पपिता पोलपोलवार मंगेश खोब्रागडे, बाली दिवसे, नाहीद भडके, साईनाथ वाकडे, करिष्मा मडावी, रितिका मडावी, अश्विनी निखाडे, लक्ष्मीकांत भडके, प्रशांत अवताडे, सुप्रीत डोंगरे, डेव्हिड देवगडे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने