Top News

मुधोलीच्या सरपंचपदी बंडू पाटील नन्नावरे.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणा-या मुधोली ग्राम पंचायत सरपंच पदाची माळ बंडू पाटील नन्नावरे यांच्या गळ्यात पडली. 

         तुकडोजी महाराज परिवर्तन पॅनल तर्फे सदस्य म्हणून निवडून आलेले बंडू पाटील नन्नावरे यांची सरपंच म्हणून अविरोध निवड करण्यात आली. तर वैशाली सिडाम यांचीही उपसरपंच म्हणून अविरोध निवड करण्यात आली.
             
     यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य मोनाली घरत, वर्षा रंधये, सोमेश्वर पेंदाम यांचे पुष्पहाराने स्वागत करुन अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी पॅनल अध्यक्ष हनुमान राणे, सुधीर मुडेवार, जितेंद्र पेंदाम, नाना गजभे, सुरेश दडमल, सलाम शेख उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने