महाराष्ट्र:- चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय-नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. राँग साईड वाहन टाकून पोलिसांशी दादागिरी केल्याप्रकरणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, वडिलांसह काही जणांविरूद्ध शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन, अटक केली आहे.
दुपारी बाराच्या सुमारास बसचालक सीकरजवळ भटकंती करून शहरात शिरला. शहरातील एसके हॉस्पिटल जवळ ट्रॅफिक महिला पोलिस कमला आणि हेडकॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनी बस थांबविली. तेथे हेड कॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनीही बस चालकाच्या जड वाहनात शहरात प्रवेश बंदी केल्याप्रकरणी 500 रुपयांचे चालान कापले . माझ्या बसची चौकशी का करता मी महाराष्ट्राचा आमदार आहे. माझ्या वाहनांची तपासणी करायची नाही, असे म्हणून राजस्थान पोलीसासोबत कीर्तिकुमार भांगडिया यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. तेव्हा आमदार बंटी भांगडीया यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीला हात लावत हातापायी झाल्याची चर्चा सुरू आहे.
इतकेच नव्हे तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अश्लील शब्दात शिवीगाळ करून धमकी दिली. या भांडणात हेडकॉन्स्टेबल गिरधारीसिंगचा गणवेश फाडून त्यांच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. महिला कॉन्स्टेबल कमला यांच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला.
आमदार बंटी भांगडियासह माजी आमदार मितेशकुमार भांगडिया, भाऊ श्रीकांत यांच्यासह द्वारका दास तथा यवतमाळ येथील शंकर लाल याला अटक पाचही जणांवर गुन्हा दाखल केला. अटकेनंतर पाचही जणांची वैद्यकीय तपासणीसाठी रवानगी करण्यात आली.