🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चक फुटाणा गावात मोठया उत्साहात शिवजयंती कार्यक्रम संपन्न.

छत्रपतींच्या वेशातील युवक ठरला सर्व ग्रामवासीयांचे आकर्षक.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:-:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चक फुटाणा गावात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनात व युवा वर्गाच्या सहकार्याने शिवजयंतीचा कार्यक्रम सामाजिक सभागृहात  साजरा करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमांचे पालन केले गेले.

         शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच सौ जयश्री अर्जुनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ईश्वर पिंपळकर उपसरपंच,श्रीकृष्ण अर्जुनकर अध्यक्ष नागरी महिला सहकारी पतसंस्था,गडचिरोली,दुशांत निमकर अध्यक्ष शब्दांकूर फाऊंडेशन चंद्रपूर,प्रा.संदीप अर्जुनकर, शिवव्याख्याते सुनील फलके,मोरेश्वर अर्जुनकर पोलीस पाटील,तुळशीराम रोहणकर माजी सरपंच,गोपीनाथजी ठेंगणे,गिरीधर शेंबळकर,धर्मेंद्र घरत,विलास रामगिरकर,गणेश अर्जुनकर व सर्व नवनियुक्त ग्रा.प.सदस्य इत्यादी शिवविचारपीठावर उपस्थित होते.
    
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर अर्जुनकर यांनी केले तर प्रास्ताविक नवनियुक्त ग्रा.प.सदस्य लोकेश झाडे यांनी केले.मार्गदर्शक दुशांत निमकर यांनी शिवविचारपीठावरून महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यतिमत्व,विचार व कार्य आधुनिक काळात सर्वच क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे असे परखड मत व्यक्त केले.शिवव्याख्याते सुनील फलके यांनी तत्कालीन छत्रपतींच्या काळातील राजेशाही उत्कृष्ठ लोकशाहीचा नमुना होता हे छत्रपतींचा इतिहास व चरित्र सांगतांना विविध उदाहरणे,प्रसंगातून व्यक्त केले.
           या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गावातील शिवप्रेमी सुर्यकांत लखमापुरे,देवानंद चंदावार, उद्धव बोबडे,ज्ञानेश्वर अर्जुनकर,नयन अर्जुनकर,विनोद अर्जुनकर,प्रमोद कावरे,चंद्रप्रकाश पिंपळकर, समित निमकर,भावेश दुर्योधन,प्रभाकर लखमपुरे,नंदू चांदेकर,लक्ष्मण शेंबळकर,वासुदेव बोबडे,अमोल ठेंगणे,प्रशांत नागपुरे,पुरुषोत्तम पिंपळकर व गावातील युवा-युवती वर्ग,पुरुष,महिला व सर्व गावातील शिवप्रेमी यांनी सहकार्य केले तसेच गावातील सर्वांना नास्ता व जिलेबी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्तू बोबडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत