Top News

वरोरा येथील कु.मैत्रैई रामगुंडमवार या मुलीनी मिळालेल्या खाऊ ची रक्कम जमा करुन श्री राम मंदिर निर्माण करिता केली समर्पित.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर नरड वरोरा
वरोरा:- श्री राम मंदिर निर्माण करिता वरोरा येथील कु.मैत्रैई रामगुंडमवार या मुलीनी मिळालेल्या खाऊ ची रक्कम जमा करुन समर्पित केले. कु.मैत्रैई रामगुंडमवार हीने आपल्या खाऊची रक्कम श्रीराम मंदिर निर्माण कार्याकरीता महाअभियान समर्पण अर्पण केली. अभयकर वॉर्ड इथे राहणारी रामगुंडमवार हिचे आई व वडील हे शिक्षक असून तिला घरून खाऊ करिता मिळालेली रक्कम तिने खर्च न करता गोळा केली.

     आज पाच हजार पाचशे रुपये अभियाना करीता मा. श्री बाबा भागडे साहेब नगरसेवक वरोरा यांच्या हस्ते समर्पित केली. तिने ही रक्कम समर्पण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी विजयराव गोटे, नरेंद्र बोरातने, दिपक घुडे, विलास दारापूरकर, अमित असेकर, जगदीश तोटावर, प्रकाश बंडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने