🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वढोलीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- शिवछत्रपती जयंतीच्या निमित्याने संपूर्ण गावात स्वछता अभियान राबवून दिवसाची सुरुवात करण्यात आली.हनुमान मंदिर चौक,छत्रपती शिवाजी चौक येथे शीवाजींच्या प्रतिमेस पुष्ममाला अर्पण करून उपस्थित शिवभक्तांना मास्क वाटप करून महाप्रसाद वितरण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ढाल तलवारीचे तसेच उत्तुंग व्यक्तिमत्वाचे व बहुजन प्रतिपालक असा वर्तमान व भविष्यासाठी मार्गदर्शक ठरावा त्याचे स्मरण सर्वांना व्हावे,शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे आणणे महत्वाचे ठरते म्हणून उत्साहात शिवजयंती साजरी केली असल्याचे आयोजक मंडळाने सांगितले.यावेळी शिव उत्सव समिती अध्यक्ष निखिल नामेवार सह शेकडो शिवभक्तांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत