Top News

गट ग्रामपंचायत मुधोली तुकूमच्या सरपंचपदी सौ. शकुंतला डाकोटे तर उपसरपंचपदी श्री दिलीप वर्धलवार यांची निवड.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- तालुक्यातील गट ग्रा.प.मुधोली तुकूम येथे सरपंच व उपसरपंच यांनी निवड आज पार पाडली यात सरपंच पदाचे उमेदवार सर्वसाधरन स्त्री प्रवर्गातील सौ. शकुंतला रविंद्र डाकोटे यांची निवड करण्यात आली व उपसरपंच पदाकरिता सर्वसाधारण या प्रवर्गातून दिलीप हनमंतू वर्धलवार  यांची निवड करण्यात आली या गट ग्रामपंचायत  मध्ये  ०१) मुधोली चक न ०१, २) मुधोली तुकूम ३) बामणी देव अश्या तीन गावाचा सावावेश असून या तिन्ही गावाच्या नेतृत्वाखाली एकूण ७ उमेदवाराची निवड करण्यात आली. ०१) सौ-शकुंतला रविंद्र डाकोटे नवनिर्वाचित सरपंच ह्या सर्वसाधार स्त्री राखीव या प्रवर्गातून निवडून आल्या ,२) सौ-रेखा दिवाकर कलसार नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ह्या नामाप्रवर्ग या प्रवर्गातून बिनिविरोध निवडून आल्या , ३) सौ-तनुजा साईनाथ गौरकार नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ह्या सर्वसधारन स्त्री प्रवर्गातून निवडून आल्या . ०४) सौ-अल्काताई प्रकाश तोरे   नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ह्या अनुसुचीत जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या, ५)श्री-दिलीप हनमंतू वर्धलवार नवनिर्वाचित (उपसरपंच) हे सर्वसाधार पुरुष गटातून निवडून आले ६) श्री-नवनाथ गोपीनाथ सिडाम  नवनिर्वाचित सदस्य  हे अनुसुचीत जमाती  या प्रवर्गातून निवडून आल्या.७)श्री-नामदेव बोंदीजी वर्धलवार नवनिर्वाचित सदस्य हे नामाप्रवर्ग पुरुष गटातून निवडून आल्या या निवड प्रक्रियेत ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावातील नागरिक समर्थन दिले व आदींनी सहकार्य केले.ग्रा.प.कार्यालय अंतर्ग येणाऱ्या संपूर्ण कर्मचारी वर्ग व नागरीकानी सरपंच उपसरपंच व सदस्ययांचे अभिनंदन केले.   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने