राज्यात नाईट कर्फ्यु लावण्याचे नामदार विजय वड्डेटीवार यांनी दिले संकेत?


Bhairav Diwase. Feb 21, 2021
चंद्रपूर:- कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकार अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात संध्याकाळी 6 नंतर पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. सध्या विरोधक असो किंवा सत्ताधारी सर्वच राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत.

मात्र, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आता सर्वच पक्षांनी आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. नेत्यांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. शाळा आणि परीक्षेच्या संदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे शाळा सुरु ठेवाव्यात की नाही. दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी याबद्दल वेगवेगळे विचार आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात चर्चा करून निर्णय घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने