Top News

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघे जागीच ठार, दोन गंभीर जखमी.


Bhairav Diwase.     Feb 21, 2021
सिरोंचा:- दोन दुचाकींची समोरासमोर धडक झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सिरोंचा तेलंगाणाला जोडणाऱ्या प्राणहिता नदीपुलापासून १०० मीटर अंतरावर घडली अपघाची माहिती मिळताच सिरोंचा व तेलंगाणा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी तेलंगाणा राज्यातील चेंनूर येथे भरती केले.

 रामप्रसाद परसा (२६) रा.सिरोंचा, रेवंत मुडीमडीगेला (२१) व सुमन सल्ला रा.अंकिसा अशी या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर रवी सल्ला, नितीन जक्कुला हे दाेघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तेलंगणा राज्यातील मंचेरीयल येथे भरती करण्यात आले आहे.

रामप्रसाद व रेवंत हे तेलंगणा राज्यातून सिराेंचाकडे दुचाकीने डब्बलसीट येत हाेते, तर सुमन, रवी व नितीन हे तिघे सिराेंचावरून तेलंगणा राज्यात ट्रीपल सीट जात हाेते. दाेन भरधाव दुचाकींची समाेरासमार धडक बसली. ही धडक एवढी जबर हाेती की, दाेन्ही दुचाकींचा समाेरचा भाग चकनाचूर झाला. पाचही जण दुचाकींवरून डांबरी रस्त्यावर उसळून पडले. त्यामध्ये तिघे जागीच ठार झाले.

 दाेघे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. हा अपघात तेलंगणा राज्याच्या हद्दीत कोटापल्ली पोलीस स्टेशनअंतर्गत घडला. त्याचा पुढील तपास ठाणेदार नागराज करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने