शेगाव बु ग्रामपंचायत वर भाजपा, शिवसेना, प्रहार महायुतीचा झेंडा.

भाजपा चे सिद्धार्थ पाटील सरपंच पदी तर शिवसेनेची साधनाताई मानकर उपसरपंच पदी निवड.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- शेगाव बु  ग्रामपंचायत वर आज दि 8/2/2021ला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, प्रहार महायुतीचा  झेंडा फडकला भारतीय जनता पार्टी चे सिद्धार्थ सदाशिव पाटील सरपंच व शिवसेना चे साधनाताई नितीन मानकर यांची उपसरपंच म्हणुन नियुक्ती झाली. सदस्य - सागर कामडी , प्रफुल वाढई, सतीश गायकवाड, मायाबाई तडस , रेखाबाई दडमल, यांना शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते, ज्योतीताई वाकडे जिल्हा परिषद सदस्य, डॉ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, ओम भाऊ मांडवकर भाजपा नेते  , सचिन नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो  , शेरखान पठाण प्रहार नेते यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य गण  चे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व  त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



     या वेळी प्रमुख उपस्थिती  सुरेश महाजन शहराध्यक्ष वरोरा, सायरा शेख जिल्हा महामंत्री महिला आघाडी भाजपा, निंबाळकर ताई तालुका अध्यक्ष महिला आघाडी, राजूभाऊ बच्चूवार भाजपा नेते, राजूभाऊ राऊत शिवसेना उपतालुका प्रमुख, अक्षय बोंदगुलवार युवा नेते प्रहार, गजानन ठाकरे शहराध्यक्ष शिवसेना, चंद्रशेखर कापटे कामगार सेना, ईश्वर नरड, अमोल दातारकर, कोसुरकार  सर, प्रणय लोणकर, विजय बरडे, संजय घोडमारे, महेश देवतळे,  शरद आत्राम, चिरंजीवी रावी, अभिषेक रायपूरकर, वैभव घोडमारे, मुजु शेख, अक्षय दातारकर, भूषण चाफले, शुभम घोडमारे, सुखदेव नरड, अमर सहारे, सौरभ पवार, नरेश रणदिवे, वैभव बोदगुलवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, प्रहार चे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने