चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी- चिमूर मार्गावर स्कारपिओ गाडीने आटोला ओव्हरटेक करित धडक मारल्याने आटोतील प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज ( 26 फेब्रुवारी ) ला सकाळी ११ वाजताचे सुमारास घडली.
नेरी येथील रहिवासी विनायक वैरागडे हा आटो चालक – मालक प्रवासी घेवून चिमुरला जात असतांना मागेहून येणाऱ्या स्कारपिओ गाडी (क्रमांक – एम. एच.- ३१,डि.के. ५२४९ ) या गाडीने आटोला ओव्हरटेक करीत जोरदार धडक दिली हा अपघात नेरी –कळमगाव च्या मध्ये दंडारे यांच्या शेताजवळ झाला.
आटोतील प्रवासी ईमरान भाई शेख ( वय – ५५, रा. – नेरी ) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अँटोचालक मालक विनायक वैरागडे यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आटोतील इतर प्रवासी सुखरूप आहेत. जखमींना उपचारार्थ चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चिमूर येथील साँ मिल मालक पटेल यांच्या मालकीची स्कारपिओ गाडी असून पोलीसांना घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. पुढील तपास चिमूर पोलीस करित आहेत.