Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा येथे प्राध्यापक खान यांचे मार्गदर्शन.

Bhairav Diwase.       Feb 08, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष द्वारा राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) ची प्रारंभिक तयारीसाठी प्राध्यापक खान महात्मा गांधी महाविद्यालय, गडचांदूर यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. 

    प्राध्यापक खान यांनी नॅक गुणांकसाठी कशाप्रकारे प्रारंभिक तयारी करावी लागते ते उत्कृष्टपणे समजावून सांगितले. नॅक करवून घेण्यासाठी महाविद्यालयाने, महाविद्यालयातील विविध विषयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन मेहनत करावी अशी ठाम भूमिका घेतली. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद द्वारे सात गुणांकवर महाविद्यालयाचे गुण अवलंबून असतात त्यामुळे प्रत्येक गुणांकवर भर देऊन योग्य प्रकारे महाविद्यालयाचे मानांकन देण्यात येते. 
     
    त्यामुळे या सर्व गुणांकवर विशेष भर देऊन महाविद्यालयाचे उत्कृष्टपणे कामगिरी होत असते. ग्रामीण भागात महाविद्यालये महत्वाची भूमिका निभावत असते त्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि योग्य मार्गदर्शन यामुळे समाजजीवनात महाविद्यालयाचे स्थान महत्वाचे आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमास चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पठाण सर, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स प्राचार्य डॉ. गुल्हाने सर आणि परिसरातील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुधीर हुंगे यांनी तर प्रास्ताविक डॉ. अनंत देशपांडे,  समन्वयक , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांनी केले व आभार प्राध्यापक सतीश पिसे, ग्रंथालय व महितीशास्त्र प्रमुख यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने