चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे कर्मयोगी गाडगे महाराज जयंती साजरी.
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे कर्मयोगी गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग पोंभूर्णाचे अभियंता श्री मुकेश टांगले, कनिष्ठ अभियंता वृषभ दारवेकर त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य बावणे मॕडम उपस्थित होते. कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे यांनी प्रकाश टाकला. स्वच्छतेची आणि शिक्षणाची गरज समाजाला फार मोठ्या प्रमाणात आहे. हे त्यांनी समजावून सांगितले.
त्याप्रमाणे श्री टांगले सर यांनी पावर पांईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. अपघात कसे टाळता येईल हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक अमोल गर्गेलवार आणि मान्यवरांचे आभार प्राध्यापक सतीश पिसे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे योगदान लाभले.