🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोरोना लस घेतलेला डॉक्टर कोरोनाबाधित; प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र सील.


चंद्रपूर:- कोरोना लस घेतलेला वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह निघाल्यानं चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सील केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे.

प्रशासनाकडून आरोग्य केंद्र सील......

कोरोना लस घेतलेला वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानं चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र सील करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरनं लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेतली होती.

चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढली....

चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 22 रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं आहे. तर,एकाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23278 तर 394 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्ण वाढल्यास लॉकडाऊनचा विचार.....

कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. अमरावती-नागपुरातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत वडेट्टीवारांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारवर दबाव होता हे त्यांनी मान्य केले. मात्र, आता वाढत असलेल्या रुग्ण संख्येकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आपत्ती व्यवस्थापनाचे नियम व कोरोना नियमावली पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले. लग्न व इतर जाहीर कार्यक्रमात होणारी गर्दी नियंत्रित करण्यावर भर देणार असून लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम न पाळल्यास अंशतः लॉक डाऊनचा विचार करावाच लागेल, असेही ते म्हणाले.