शाळेची फि कमी करण्याबाबत पालकांनी दिले निवेदन.

Bhairav Diwase
आमदार साहेबांना निवेदनातून फी माफी करण्याची केली मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- जगात कोरोना सारख्या विषणाचा विळखा घातला असता शाळा महाविद्यालय बंद होते अशातच माणिकगड इंग्लिश मीडियम स्कूल मुलांकडून शालेय फि वसुल करण्यासाठी पालकांना फोन फीस भरण्याचा तगादा लावण्यात येत आहे. लॉकडाउन च्या काळात रोजगार बंद हाताला काम नाही. सर्वसामान्य पालकांना पूर्ण फि भरने अवघड जात आहे. असे असताना फि कशी का पद्धतीने भरायची मूल एकही दिवस शाळेत न जाता.अशातच पालक वर्ग चितेत पडले. शाळेतिल व्यवस्थापक मंडळीनी कोरोनाचा संकट लक्षात घेऊन शाळेची फि माफ करावी अशी पालकांनी प्रतिक्रिया दिली.निवेदन देतांना गडचांदूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री संतोष महाडोळे, श्री कैलाश म्हस्के, श्री अशोक जाधव, श्री महेश गोरे, श्री कांतीलाल चव्हाण उपस्थित होते.