Top News

पोंभूर्णा तालुक्यातील गावागावात घुमला शिवसेनेचा झेंडा प्रस्थापितांना धक्का; ग्रामीण भागात जोरदार मुसंडी.

आज घेण्यात आलेल्या आठ  ग्रामपंचायतीवर शिवसेना ४ भाजपा २ कॉंग्रेस १ गोंडवाणा गं.पार्टी १.

भाजपाच्या गडाला शिवसेनेने लावला सुरुंग.
Bhairav Diwase.      Feb 10, 2021



पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील २७  ग्रामपंचायातीच्या निवडणुका संपन्न झाले असुन आज पासुन १०,१२,१३ व,१५ फेब्रुवारी ला  सरपंच व उपसरपंच निवडणुक होत आहे. आज घेण्यात आलेल्या  ९ ग्रामपंचायाच्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत ४, ग्रामपंचायातवर शिवसेनेने सत्ता काबीज केले आहे. तर २ ग्रामपंचायतीवर भाजपाचा तर एक कॉंग्रेसने राखली.

माजी मंत्री सुधिर मुंनगटीवार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व महिला जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम यांच्या क्षेत्रातील  भाजपाच्या गडाला सुरुंग लावत भाजपाला हादरा बसला आहे.

तालुक्यातील एका ही ग्रामपंचायतील  शिवसेनेचा सरपंच व उपसरपंच नव्हता या निवडणूकीत २७ ग्रामपंचायती पैकी 13 ग्रामपंचायती लढवल्या त्यात तबल्ल ७ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला भाजपाच्या गडाला सुरुंग लावत अनेक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती शिवसेनेने  जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार व गणेश वासलवार यांच्या नेतृत्त्वात काब्बीज केले आहे.

 आज तालुक्यातील आठ ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात शिवसेनेने   दिघोरी, येथे सरपंचपदी वनीता वाकुडकर तर उपसरपंचपदी शंकर वाकुडकर,हत्तीबोडी येथे  सरपंचपदी संगीता कुडमेथे तर उपसरपंचपदी मिनाताई ढोले तर  घनोटी तुकुम येथे सरपंचपदी योशोद संदीप ठाकरे तर उपसरपंपदी वैशाली बुरांडे आष्टा येथे सरपंचपदी किरण किशोर डाखरे तर उपसरपंचपदी रमेश गंगाधर कुमरे यांची निवड झाली ह्या ग्रामपंचायतीत शिवसेनेचा सरपंच व उपसरपंच निवडणुकीत बाजी मारली तर भाजपा ने दोन ग्रामपंचायतवर राखले चेक बल्लारपुर सरपंचपदी मीनाक्षी ढुमने तर उपसरपंचपदी प्रविण लाबाडे तर पिपरी देशपाडे येथे सरपंचपदी चंद्रशेखर व्हाडकर  उपसरपंचपदी कालिदास मोडघरे  यांची निवड तर कॉंग्रेसने एक घोसरी ग्रामपंचायत राखत सरपंच पदी रोशना लोडे तर उपसरपंचपदी जितेंद्र चुधरी तर सातारा भोसले ग्रामपंचायतवर गोंडवाणा गं.पार्टी ने झेंडा फड़कवत सरपंचपदी शालिनीताई नरेंद्र सिडाम उपसरपंचपदी प्रविण पेंदोर यांची निवड झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने