Top News

नाला वळती प्रकरणावरून जि. प. सभापती सुनील उरकुडे यांनी वे को ली ची केली दमछाक.


Bhairav Diwase.          Feb 23, 2021
राजुरा:- वेकोली च्या नाले वळती करण्याच्या सापट्या मूळ गोवरी येथील काही शेत जमीन 2006 पासून सतत पुराखाली येऊन दर वर्षी काही शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे नुकसान होत आहे. व तीन नाल्याचे पाणी एकत्र आल्याने गावाला सुद्धा पुराचा त्रास वाढलेला आहे.     सदर प्रश्न सातत्याने प्रशासनाकडे मांडत असतांना आता अनधिकृत रित्या वे को ली प्रशासनाने त्याच ठिकाणी आणखी एक नाला वळती करण्याचे काम प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता किंव्हा कोणतीही प्रशासकीय तांत्रीक मंजुरी न घेताच मनमर्जीने सुरू केले आणि ते काम अंतिम टप्प्यात आले असता शेतकऱ्यांना लक्षात आले त्याच दिवशी मौक्यावर शेतकऱ्या सह जाऊन जि. प. सभापती सुनील उरकुडे यांनी नाला वळती कर्णाचे काम थांबविले आणि आधी वेकोली श्रापित शेत जमिनी अधिग्रहित करा नंतर काम सुरू करा असे वे को ली प्रशासनाला ठणकावून सांगितले तब्बल पाच तास काम बंद ठेऊन ते तसेच बंद राहील असे सांगून नंतर वे को ली महा प्रबंधकांशी बैठक केली प्रशासनाने जमिनी अधिग्रहित करण्याचे काबुल केले परंतु नाला उत्खनन कार्य चालू केले , सदर समस्ये बद्दल आज दिवसभर मान तहसीलदार गाडे साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना मौक्यावर काय चालू आहे ते अवगत करून देण्यासाठी मौक्याचा दौरा करण्याची विनंती केली आणि विनंतीला मान देऊन तहसीलदारांनी सोबत जाऊन दौरा केला आणि वे को ली मार्फत होणारी शेतकरी व गावकऱ्यांची होणारी पिळवणूक प्रत्यक्षदर्शी अनुभवल्यानंतर आणि शेतकऱ्यांची परिस्थिती डोळ्याने पाहल्या नंतर त्यांनी सदर काम कोणत्या नियमानुसार अथवा कोणत्या परवानगी नुसार चालू करण्यात आले याची माहिती मागवून नियमानुसार नसल्यास तात्काळ काम बंद करणार असे विश्वास देऊन आश्वासन दिले.
     
  त्यामुळं उपस्थित शेतकऱ्यांच्या मनात उमेद जागृत झाली. या प्रसंगी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे,तलाठी सुनील रामटेके, गोवरी ग्राम प सदस्य शंकर बोढे, विलास लोहे, अजय बंदूरकर, सचिन पाचभाई, शेखर पाचभाई, प्रभाकर लोहे, ज्ञानेश्वर लोहे, किशोर लोहे, उमेश बोढे, समस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी दौऱ्यात होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने