Click Here...👇👇👇

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन होणार:- उदय सामंत.

Bhairav Diwase
दोन पद्धतींनी होणार परीक्षा, विद्यार्थ्यांनी ठरवावं!
Bhairav Diwase.       Feb 27, 2021
महाराष्ट्र:- सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत चालली आहे. तर पालक आणि विद्यार्थी यांना परीक्षांची चिंता सतावत आहे. कारण नियमित कॉलेज आणि लेक्चर ऑनलाईन होऊ शकले, पण परीक्षा ऑनलाईन होतील का? झाल्या तर कशा होणार? आणि ऑनलाईन नाही तर ऑफलाईन तरी कशी घेतली जाणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे. जास्तकरून परीक्षा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्येच होतात. यामुळे आता शिक्षण विभागाला देखील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे महत्त्वपूर्ण पावले उचलावी लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दोन पद्धतींनी होणार परीक्षा, विद्यार्थ्यांनी ठरवावं!.......

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतीत माहिती दिली, 'राज्यात यंदा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात संबंधित विद्यापीठांनी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाकडून हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे दोन्ही पर्याय ऐच्छिक असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन, याचा निर्णय आता विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे', असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनासंदर्भातल्या नियमांचं पालन करूनच परीक्षा देता येणार आहे.