चिंतामणी महाविद्याल पोंभूर्णा येथे मराठी भाषा गौरव दिवस साजरा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Feb 27, 2021

पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा येथे वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्याम मोहरकर, झाडीबोली भाषा अभ्यासक, नाट्यकलावंत, समीक्षक हे उपस्थित होते. आपल्या वक्तव्यात मोहोरकर सर म्हणाले की, 'मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी असे वाटत असेल तर ती अविष्कराची भाषा झाली पाहिजे. तर ती ज्ञानभाषा झाल्याशिवाय राहणार नाही.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.एन.एच. पठाण अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 'मराठी भाषेची अस्मिता जपणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कार्य आहे.' असे वक्तव्य त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. परमानंद बावनकुळे, मराठी विभाग प्रमुख, यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. मनोहर गुडधे, सांस्कृतिक विभाग प्रमुख, यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी आणि कर्मचारी ऑनलाईन जुळले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.