Top News

वार्ड नं.05 येथे खाली जागेत आगीचे तांडव.


Bhairav Diwase.    March 20, 2021
मुल:- मूल येथिल प्रभाग क्रं.02 वार्ड नं.05 या राहत्या वस्तीत असलेल्या गोयल यांच्या मालकीचे खाली जागेवर अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. ही घटना आज दुपारी 12 वाजताचे दरम्यान घडली. खाली जागेवर गवत,झाडे झुडपी होती. तिथेच शेजारील नागरीक खत,राखड सुद्धा टाकत असतात. तिथेच आज अचानक आग सुरू झाल्याने काही वेळात आगीने रूद्र रूप धारण केली. खाली असलेल्या जागेला लागुनच नागरीकांचे घरे आहेत. त्यामुळे नागरीक घाबरले होते.  

     आग लागली असल्याचे कळताच शेजारचे नागरीकांनी एकत्र येत आग विझवु लागले. नागरीकांनी मुल येथिल अग्निशामक दलाला फोन केले असता गाडीत बिघाड असल्याने पोंभुर्णा येथिल अग्निशामक दलाची गाडी येऊन आाग विझविण्यासाठी प्रयत्न केले. शेजारील नागरीक आणि मुल, पोभुर्णा येथिल अग्निशामन दलाचे कर्मचारी आग विझविण्यात प्रयत्न केले. अखेर तीन तास चाललेल्या या प्रयत्नाला यश आले, आग आटोक्यात आली. या घटनेत कुठलीही हानी झाली नसुन मोठा अनर्थ टळला. मूल शहरात असलेल्या मालकीच्या खाली, जागा किंवा प्लॉट जागेच्या मालकाने कुंपण करून,  स्वच्छ ठेवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने