वाळूची अवैध वाहतूक करणारे 4 ट्रक जप्त.

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase.     March 14, 2021
गडचिरोली:- सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाने लांझेंडा घाटावरून वाळूची अवैध वाहतूक करणारे 4 मिनी ट्रक जप्त केले. ही कारवाई शनिवारी चंद्रपूर रोड नवेगाव येथे करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांच्यासह तलाठी अजय तुनकलवार,भूषण जवंजाळकर,गणेश खंडारे, कोतवाल किशोर मडावी यांचा सहभाग होता.

       लांजेडा रेती घाटावरून नवेगावच्या दिशेने 4 मिनी ट्रक द्वारे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती सहा. जिल्ह्याधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाला कळली. त्यांनी वाळू वाहतूक करणारे ट्रक थांबवून वाहतूक परवाना तपासला असता त्यात संशयास्पद असे आढळून आल्याने वाळू सह 4 मिनी ट्रक पंचनामा करून जप्त केले. यामध्ये 4 मिनी ट्रक व 9 ब्रास वाळूचा पंचनामा करून उपविभागीय कार्यालय गडचिरोली येथे ठेवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)